कधी घास भरवा म्हणून,
बाबा कडे हट्ट धरते.
कधी त्याच हट्टाने,
छोटा घास त्याला भरवते.
म्हणून मुलगी बापाच्या,
काळजाचा तुकडा असते.
कधी थकलेल्या बापाला,
हळूच येऊन मिठीत घेते.
गोड गाली हसून ती,
थकवा त्याचा दूर करते.
म्हणून मुलगी बापाच्या,
काळजाचा तुकडा असते.
मुलीच जग बाबा,
बापाचं जग मुलगी असते.
नेहमी ती बाबांच्या,
मागेपुढे करत असते.
म्हणून मुलगी बापाच्या,
काळजाचा तुकडा असते.
नखरा तिचा झेलण्याची,
बापाची नेहमी तयारी असते.
या जगात एकच नाते,
जगापेक्षा वेगळे असते.
आणि मुलगी बापाच्या,
काळजाचा तुकडा असते.
_______तेजाकांत.