तेजाकांत (राजेंद्र सरगर )
माझ्या मनातील कविता........
Pages List
Home
शनिवार, ५ जुलै, २०२५
पंढरीची वारी
हाती विना आणि टाळ, गंध लावूनी कपाळी.
डोई तुळस आणि, ध्वज भगवा खांद्यावरी.
विठुरायाच्या नामात ,गेली रंगुनीया सारी.
नसे कोणी इथे राव,नसे कोणीही भिकारी.
जात पात विसरूनी, होती एकरूप सारी.
असं एकच ठिकाण, माझ्या पंढरीची वारी.
चुका
चुकत नाहीत असे नाही,
चुकताततर सारेच मित्रांनो.
फक्त आपली चूक,
लपवतात सारेच मित्रांनो.
दुसरा कोणी चुकला तर,
दवंडी गावभर पीटतात मित्रांनो.
आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, यालाच तर म्हणतात मित्रांनो.
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)