Pages List

मंगळवार, १९ ऑगस्ट, २०२५

बाळूमामा

दुःख सागरातून नौका, होई सहज पार, 
ज्याला लाभला लाभला, बाळूमामाचा कैवार.

दिन दलित भक्तांचा, खराखुरा हो आधार, 
करुणामूर्ती बाळूमामा, असे देवाचा अवतार.

हाक ऐकून भक्ताची, येई धावून सत्वर, 
त्यांच्या मायेच्या पंखाखाली, सुखी भक्तांचा संसार.

विश्वासाचा दीप तुम्ही, श्रद्धेचा आधार, 
जय जय बाळूमामा, तुम्हा माझा नमस्कार.
                                -----------  तेजाकांत.