स्वराज्याचा धाकला धनी,
खरंच माझा थोर होता.
रयतेचं रक्षण करणारा,
स्वराज्याचा रक्षक होता.
अगम्य साहस बाळगणारा,
महापक्रमी वीर होता.
सिंहाचेही दात मोजणारा,
शेर शिवबाचा छावा होता.
शब्दाने लखलखती तलवार,
नीतीने तो न्याय होता.
शक्तिमान असूनही नम्र,
असा शंभू राजा होता.
अष्टभाषा अवगत असणारा,
संवाद कलेचा ज्ञानी होता.
किशोर वयातच ग्रंथ लिहिणारा,
तो विद्वत्तेचा दीप होता.
धगधगत्या छातीची मशाल,
शत्रूंचा कर्दनकाळ होता
औरंग्याचा अहंकार ठेचणारा,
शिवधर्माचा वाघ होता.
हसत हसत मरणयातना,
चाळीस दिवस सोसत होता.
धर्मासाठी बलिदान देणारा,
सच्चा धर्मवीर होता.
हरला नाही जिंकला होता,
शत्रूंनाही पुरून उरला होता.
होय माझा शंभूराजा,
खरंच खूप थोर होता.
खरच खूप थोर होता.