मंगळवार, १९ ऑगस्ट, २०२५
बाळूमामा
शनिवार, ५ जुलै, २०२५
पंढरीची वारी
चुका
रविवार, ११ मे, २०२५
शंभूराजा
शनिवार, ५ एप्रिल, २०२५
शुक्रवार, ४ एप्रिल, २०२५
बिरोबा
शुक्रवार, २१ मार्च, २०२५
इशारा
रविवार, २२ डिसेंबर, २०२४
सुख दुःख
रविवार, २९ सप्टेंबर, २०२४
महात्मा गांधी
सोमवार, १९ फेब्रुवारी, २०२४
शिवाजी महाराज
सर्व जाती धर्मांना जोडणारा,
एक मजबूत धागा होता,
तो आपला शिवबा होता.
ज्यांच्या लढण्यातील गनिमी कावा,
कुठल्याच शत्रूला उमगला नव्हता,
तो आपला शिवबा होता.
समृद्ध आरमार उभा करणारा,
भारतीय आरमाराचा जनक होता,
तो आपला शिवबा होता.
परस्त्रीला आई समान मानणारा,
जिजाऊंचा तपस्वी छावा होता,
तो आपला शिवबा होता.
आदिलशाही,निजामशाही, पोर्तुगीज इंग्रज,
१७६० आक्रमकांना पाणी पाजणारा,
अखंड हिंदुस्थानाचा सम्राट होता,
तो आपला शिवबा होता.
मराठी मुलुखाचा भगवा झेंडा,
अटकेपार ज्यांनी गाडला होता,
तो आपला शिवबा होता.
------ प्रा. राजेंद्र सरगर (तेजाकांत)
(७५८८१६७०८७)
शुक्रवार, १ डिसेंबर, २०२३
तिरस्कार
शुक्रवार, १९ मे, २०२३
अहिल्यादेवी होळकर यांची घोषणा
बुधवार, २५ मे, २०२२
बाजीप्रभू देशपांडे.
शिवरायांच्या स्वराज्याचा,
कणखर एक बुरुज होता.
नाव ऐकुनी बाजीप्रभुंचे,
गनीम थरथर कापत होता.
लाख मेले,
चालतील राजे,
पोशिंदा लाखांचा जगला पाहीजे.
वडीलकीने राजांना दटावणारा,
वीर दुसरा घडला नाही.
जोवरी राजा माझा,
विशाळगडी पोहोचत नाही.
यमालाही सांगा म्हणतो,
मारायला मजला वेळ नाही.
घोडखिंडी तो उभा ठाकला,
तसूभरही हलला नाही.
जोवरी तो आवाज तोफेचा,
कानावरती पडला नाही.
काय वर्णावे शौर्य तयांचे,
सूर्य दिपविला तेजाने.
लढता लढता,
घोडखिंडीला,
पावन केले रक्ताने.
------ तेजाकांत.
शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२
नोकरी
मन नाही लागत ईथे,
दररोज म्हणतात सारे,
पण सत्य एकच सांगतो ऐका,
तीच्यावरती मरतात सारे.
एक मात्र खरे आहे,
तिच्यामुळेच जगतात सारे.
आहे तिच्यात खुश परी,
कधी कुठे असतात सारे.
हिच्यापेक्षा चांगली मिळाली,
यत्न रोज करतात सारे.
चांगली कधी मिळत नसते,
मनोमनी हे जाणतात सारे.
लोहा मानून गुमान तिच्या,
तालावरी नाचतात सारे.
बायको पेक्षा वेळ हीलाच,
जगामध्ये देतात सारे.
घोट मदिरेचा कटू तरीही,
पिऊन तिजला असतात सारे.
ती म्हणजे नोकरी मित्रांनो,
जीच्यावरी मरतात सारे.
----- तेजाकांत




