Pages List

मंगळवार, १६ जानेवारी, २०१८

बापू बिरू वाटेगावकर (आप्पा)

बोरगावच्या लाल मातीत, घाम गाळला तूम्ही.
पंचक्रोशीत नाव केले, सच्चा पैलवान बापू तूम्ही.

          अन्याय कधी केला नाही, सहन कसा कराल तूम्ही.
          संसारावर विस्तव ठेउनी, रक्षण गावाचे केले तूम्ही.

थोरामोठ्यांच्या विनंतीला, मान आप्पा दिला तूम्ही.
गावगुंडांचा करुनी वध, बोरगाव केले मुक्त तूम्ही.

          गोरगरीब आयाबहिणींचे, तारणहार ठरला तूम्ही.
          दुर्जनांचा, क्रूरकर्मांचा, कर्दनकाळ आप्पा  तुम्ही.

आयाबायांचे भाऊ झाला, धनगराचा पैलवान गडी.
कैक संसार वाचविले, नवरोबांना फोडून तूम्ही.

          अटक झाली, जन्मठेप मिळाली, आप्पा नाही थांबला तूम्ही.
          अखंड महाराष्ट्रात जाउनी, समाजप्रबोधन केले तूम्ही.

आज अचानक बातमी आली, सोडूनिया गेलात तूम्ही.
काय बोलावे, काय लिहावे, पोरके आप्पा झालो आम्ही.

          भरलेल्या या डोळ्यांनी आप्पा, नतमस्तक तुमच्या पुढती.
          शब्द सुमनांची, तेजाकांत हा, वाहतो तुम्हा आदरांजली.

प्रा. राजेंद्र शामराव सरगर. तेजाकांत
मो. ७५८८१६७०८७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा