दोस्तांच्या या मैफिलीत,
असे काही मिसळतो आम्ही.
पीत असतात मित्र परी,
नशेमध्ये झिंगतो आम्ही.
झिंगतोही जरा असे की,
कोणी कधी नसे झिंगला.
नशेमन ते शांत असतात,
दंगा माझा वाढलेला.
माझीच तर नसेल ना,
थोडी हा चोरुनी प्यायला.
शंका घेतो मित्र माझा,
घट्ट धरुनी त्याचा प्याला.
असुनी इतक्या नशेत त्याने,
वास माझ्या मुखाचा घेतला.
गंध मदिरेचा येता तयास,
अखेर तू प्यायलास म्हणाला.
सांगेल कोण परी त्याला,
गंध मदिरेचा कुठून आला.
आला माझ्या मुखातून कि,
बापड्या तव तुझाच याला.
----- तेजाकांत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा