गुरुवार, १२ जुलै, २०१८
मंगळवार, १६ जानेवारी, २०१८
बापू बिरू वाटेगावकर (आप्पा)
बोरगावच्या लाल मातीत, घाम गाळला तूम्ही.
पंचक्रोशीत नाव केले, सच्चा पैलवान बापू तूम्ही.
अन्याय कधी केला नाही, सहन कसा कराल तूम्ही.
संसारावर विस्तव ठेउनी, रक्षण गावाचे केले तूम्ही.
थोरामोठ्यांच्या विनंतीला, मान आप्पा दिला तूम्ही.
गावगुंडांचा करुनी वध, बोरगाव केले मुक्त तूम्ही.
गोरगरीब आयाबहिणींचे, तारणहार ठरला तूम्ही.
दुर्जनांचा, क्रूरकर्मांचा, कर्दनकाळ आप्पा तुम्ही.
आयाबायांचे भाऊ झाला, धनगराचा पैलवान गडी.
कैक संसार वाचविले, नवरोबांना फोडून तूम्ही.
अटक झाली, जन्मठेप मिळाली, आप्पा नाही थांबला तूम्ही.
अखंड महाराष्ट्रात जाउनी, समाजप्रबोधन केले तूम्ही.
आज अचानक बातमी आली, सोडूनिया गेलात तूम्ही.
काय बोलावे, काय लिहावे, पोरके आप्पा झालो आम्ही.
भरलेल्या या डोळ्यांनी आप्पा, नतमस्तक तुमच्या पुढती.
शब्द सुमनांची, तेजाकांत हा, वाहतो तुम्हा आदरांजली.
प्रा. राजेंद्र शामराव सरगर. तेजाकांत
मो. ७५८८१६७०८७

शनिवार, २६ ऑगस्ट, २०१७
आमचा गणपती बाप्पा.
आमचा गणपती बाप्पा.
गणपती बाप्पा हा दशदिशांचा स्वामी आहे. इतर सर्व देवता त्याच्या परवानगीशिवाय कोणत्याही दिशेने येऊ शकत नाहीत; म्हणून कोणतेही मंगलकार्य किंवा इतर कोणत्याही देवतेची पूजा करताना प्रथम गणपती पूजन करतात. गणपतीचा नामजप हा प्राणशक्ती वाढविणारा आहे.
बुद्धीची देवता आणि सर्व स्तरातील लोकांना प्रिय असणाऱ्या विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पांचे आगमन भाद्रपद महिन्यातील, शुक्ल पक्षातील चतुर्थीला होते आणि बाप्पांची प्रतिष्ठापना संपूर्ण भारतवर्षामध्ये घराघरांत केली जाते. आमच्या सरगर कुटुंबामध्ये गणेशोत्सव सन २०१० पासून साध्या पद्धतीने पण अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो. त्याचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
१) बाप्पांची मूर्ती :
पुराणांत गणपती हा मळापासून बनविला असल्याचे दाखले आहेत. चिकनमती किंवा शाडूपासून तयार केलेल्या मूर्तीमध्ये गणेशततत्व आत्कृष्ट होण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे आमच्या बाप्पांची मूर्ती ही शाडूच्या मातीची व नैसर्गिक रंगानी रंगविलेली असते. आमचा बाप्पा पाटावरती विराजमान असून तो डाव्या सोंडेचा आहे. डाव्या सोंडेचा गणपती हा शांत शितल स्वभावाचा व अध्यात्मपूरक मानला जातो. त्याच्या चेहऱ्यावरती एक शांत व मंद स्मित जाणवते. त्याचे दर्शन घेत असताना तो आपणास हर्षभराने आशीर्वाद देत आहे असेच वाटते.
२) सजावट :
आमच्या बाप्पांच्या मंदिराची सजावट देखील खूप साध्या पद्धतीने व पर्यावरणास हानी पोहोचणार नाही अशाप्रकारे केली आहे. बाप्पांच्या मंदिराचा पूर्ण सांगाडा हा लोखंडापासून आम्ही स्वतः तयार केलेला आहे आणि मागील तीन वर्षांपासून वापरत आहोत आणि पुढील अनेक वर्षे वापरला जाईल. मंदिराच्या सर्व भिंती या कापडापासून तयार केलेल्या आहेत. मंदिराचा कळस तयार करीत असताना आम्ही आपली पारंपरिक गुढीची संकल्पना वापरली आहे. यामध्ये कापड व कडुलिंब वापरला आहे; यामुळे वातावरणामध्ये नवचैतन्य व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा संदेश देण्याचा आमचा मानस आहे. संपूर्ण मंदिराभोवती लाईटच्या माळा सोडल्या आहेत व बाप्पांच्या मूर्तीवरतीही फोकस लाईट सोडला आहे.
मंदिराच्या मागे छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा लावल्या असल्याने वातावरण प्रेरणादायी झाले आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूस तुळस, कोरफड, आले लावलेल्या कुंड्या ठेवल्या आहेत. या कुंड्यांमध्ये मागील दोन वर्षांची बाप्पांची शाडूची माती वापरली आहे. मंदिराच्या समोर दोन समई अखंडपणे चालू असल्याने बाप्पांसमोर मंगलमय प्रकाश अखंडपणे उपलब्ध होतो.
३) बाप्पांचे आगमन :
सरगर कुटुंबामध्ये बाप्पांचे आगमन हे पारंपरिक पद्धतीने केले जाते. सकाळी सर्वजण स्नान करून घर व अंगण स्वच्छ झाडून व पाण्याने धुवून पवित्र केले जाते, नंतर बाप्पांना घरी आणले जाते, दारात आल्यानंतर बाप्पांवरुन भाकरी तुकडा ओवाळून टाकला जातो, पायावर पाणी घातले जाते, " गणपती बाप्पा मोरया.... , मंगलमूर्ती मोरया..." च्या जयघोषात पाटावरती कापड अंथरून त्यावरती तांदूळ ठेऊन , खास सजविलेल्या मंदिरात बाप्पांना विराजमान केले जाते. बाप्पांच्या समोर पाणी, केळी, पाच फळे, नारळ ठेवले जाते. यानंतर बाप्पांची पूजा व आरती कुटुंबप्रमुख आमचे मातापिता सौ. संपदाबाई आणि श्री शामराव सरगर यांच्या हस्ते करून प्रतिष्ठापना केली जाते. यानंतर घरातील सर्व लोक भोजन करतात.
४) बाप्पांची पूजा व आरती :
गणेशोत्सवाच्या काळात बाप्पांची आरती व गाणी मोठमोठ्याने ध्वनिक्षेपकावरती लावली जातात. आमच्या घरी मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत प्रत्यक्ष भगवान गणपती बाप्पांसमोर उभे राहून मनामध्ये भक्तिभाव ठेऊन तोंडाने सर्वजण आरती व प्रार्थना म्हणतात. यानंतर सर्वांना प्रसाद दिला जातो. आमच्या बाप्पांसाठी आम्ही खास आमच्या परसबागेमध्ये जास्वंद, गौरीची फुले, आघाडा लावला आहे तोच पूजेसाठी वापरला जातो.
आमच्या बाप्पांची प्रत्येक आरती हि एका दाम्पत्यांच्या हस्ते केली जाते. त्यांना टॉवेल-टोपी व सुवासिनींची ओटी भरून दोघांना एक पुस्तक भेट दिले जाते. यामुळे आपल्या समाजामध्ये वाचनसंस्कृती वाढविणे व स्त्रीला पुरुषप्रमाणे समान सन्मान देण्याचा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
५) बाप्पांचे विसर्जन :
आमच्या घराच्या बाप्पांना गौरी-गणपती विसर्जनानुसार सातव्या दिवशी संध्याकाळी निरोप दिला जातो. विसर्जन करीत असतानाहि आम्ही पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचणार नाही याची काळजी दक्षता घेतो. बाप्पांचे विसर्जन आम्ही आमच्या परसबागेत कुंड ठेवून त्यामध्ये करतो. नंतर त्या कुंडातील माती आम्ही सध्या कुंड्यांमध्ये घेऊन त्यामध्ये तुळस, कोरफड, फुलझाडे, आले किंवा कोथिंबीर लावतो. राहिलेली माती सर्व बागेमध्ये पसरतो. जमा झालेले निर्माल्य देखील आम्ही नदीपात्रामध्ये किंवा विहिरीमध्ये न टाकता महापालिकेच्या निर्माल्यकुंडामध्ये टाकतो; या वर्षी आम्ही त्याचे खत बनविण्याचा संकल्प केला आहे.
अशाप्रकारे अत्यंत साध्या पण भक्तिपूर्ण वातावरणामध्ये आम्ही सर्वजण गणेशोत्सव साजरा करतो.
आमच्या गणेशोत्सवाची खास वैशिष्ट्ये :
१) शाडूची गणपती बाप्पांची मूर्ती.
२) पर्यावरणपूरक गणपती मंदाराची सजावट.
३) पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पांचे आगमन.
४) रोज नवीन दाम्पत्यांच्या हस्ते गणपतीची आरती.
५) आरतीस येणाऱ्या दाम्पत्यास पुस्तक भेट.
६) ध्वनिक्षेपकाचा वापर न करता तोंडाने आरती म्हटली जाते.
७) पूजेसाठी जास्वंद, गौरीची फुले, आघाडा सर्व आमच्या परसबागेतीलच वापरले जाते
८) बाप्पांचे परसबागेमध्ये पर्यावरणपूरक विसर्जन.

रविवार, ३ जानेवारी, २०१६
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)