बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९
शनिवार, २० जुलै, २०१९
प्रेम तिच्यावरती
प्रेम मी तिच्यावरती,
आजही तितकेच करतो.
खरे सांगतो तीच्यावरती,
आजही तितकेच मरतो.
फक्त सारखे सांगणे,
हल्ली मला जमत नाही.
सुखासाठी मात्र तीच्या,
आजही तितकेच पळतो.
सांगणे मोठे कि असणे,
प्रेमात काय महत्वाचे.
न राहून पुन्हा पून्हा,
विचार याचाच करतो.
काळानुरूप थोडे माझे,
बदलले जरी वागणे.
प्रेम मी तिच्यावरती,
आजही तितकेच करतो.
----- तेजाकांत.
आजही तितकेच करतो.
खरे सांगतो तीच्यावरती,
आजही तितकेच मरतो.
फक्त सारखे सांगणे,
हल्ली मला जमत नाही.
सुखासाठी मात्र तीच्या,
आजही तितकेच पळतो.
सांगणे मोठे कि असणे,
प्रेमात काय महत्वाचे.
न राहून पुन्हा पून्हा,
विचार याचाच करतो.
काळानुरूप थोडे माझे,
बदलले जरी वागणे.
प्रेम मी तिच्यावरती,
आजही तितकेच करतो.
----- तेजाकांत.
शुक्रवार, १९ जुलै, २०१९
गंध मदिरेचा
दोस्तांच्या या मैफिलीत,
असे काही मिसळतो आम्ही.
पीत असतात मित्र परी,
नशेमध्ये झिंगतो आम्ही.
झिंगतोही जरा असे की,
कोणी कधी नसे झिंगला.
नशेमन ते शांत असतात,
दंगा माझा वाढलेला.
माझीच तर नसेल ना,
थोडी हा चोरुनी प्यायला.
शंका घेतो मित्र माझा,
घट्ट धरुनी त्याचा प्याला.
असुनी इतक्या नशेत त्याने,
वास माझ्या मुखाचा घेतला.
गंध मदिरेचा येता तयास,
अखेर तू प्यायलास म्हणाला.
सांगेल कोण परी त्याला,
गंध मदिरेचा कुठून आला.
आला माझ्या मुखातून कि,
बापड्या तव तुझाच याला.
----- तेजाकांत.
मंगळवार, ११ जून, २०१९
प्रिया माझी
काय सांगू प्रिया माझी,
मला कशी रे वाटते.
कधी चंद्र तिच्यासारखा,
कधी ती चंद्रासारखी भासते.
मला कशी रे वाटते.
कधी चंद्र तिच्यासारखा,
कधी ती चंद्रासारखी भासते.
मंगळवार, १४ मे, २०१९
लैला - मजनू
गलेलठ्ठ एका मजनूने,
लैलेवरती प्रेम केले.
भरून वाहणारे खिसे त्याचे,
सारेच्या सारे फाटून गेले.
चवळी सारखी लैला त्याची,
ढब्बूसारखी वाढत गेली.
बटाट्यासम मजनूचे परी,
सुकवलेले बोंबील झाले.
----- तेजाकांत.
लैलेवरती प्रेम केले.
भरून वाहणारे खिसे त्याचे,
सारेच्या सारे फाटून गेले.
चवळी सारखी लैला त्याची,
ढब्बूसारखी वाढत गेली.
बटाट्यासम मजनूचे परी,
सुकवलेले बोंबील झाले.
----- तेजाकांत.
मन मजनूचे
मन मुलींचं आयुष्यभर,
मुलात एका अडकून बसतं.
मन मुलांचं परी वेगळं,
त्यांच्यापेक्षा थोडं असतं.
एकाच काय, अनेक मुलींना,
मनात आपल्या जागा देतं.
म्हणुन म्हणतो मन मुलांचं,
मुलींपेक्षा मोठच असतं.
------ तेजाकांत.
मुलात एका अडकून बसतं.
मन मुलांचं परी वेगळं,
त्यांच्यापेक्षा थोडं असतं.
एकाच काय, अनेक मुलींना,
मनात आपल्या जागा देतं.
म्हणुन म्हणतो मन मुलांचं,
मुलींपेक्षा मोठच असतं.
------ तेजाकांत.
शुक्रवार, १५ मार्च, २०१९
मत्सर
तू मोठा कि मी मोठा,
आयुष्यभर लढलो आम्ही.
ना त्यांना मोठे होऊ दिले,
ना कि मोठे झालो आम्ही.
लढता लढता एक दिवस,
निरोप जगाचा घेतला आम्ही.
ते तरी का मागे राहतील,
तासभर आधीच गेले तेही.
मरणानंतर कळलं परी,
एकाच लाकडात जळालो आम्ही.
खात्री दोघांना स्वर्गाची होती,
परी नरकातच भेटलो आम्ही.
------ तेजाकांत.
आयुष्यभर लढलो आम्ही.
ना त्यांना मोठे होऊ दिले,
ना कि मोठे झालो आम्ही.
लढता लढता एक दिवस,
निरोप जगाचा घेतला आम्ही.
ते तरी का मागे राहतील,
तासभर आधीच गेले तेही.
मरणानंतर कळलं परी,
एकाच लाकडात जळालो आम्ही.
खात्री दोघांना स्वर्गाची होती,
परी नरकातच भेटलो आम्ही.
------ तेजाकांत.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
