Pages List

बुधवार, १३ मार्च, २०१९

खेळ प्रेमाचा.

लडिवाळ खेळ प्रेमाचा,
प्रेमानेच खेळलो आम्ही. 
लाख वेळा हरलो जरी,
मैदान नाही सोडले आम्ही. 

घट्ट करुनि मन आम्ही,
लाखवेळा नकार झेलला. 
मैदानाचेच काय म्हणता?
प्रतिस्पर्धीही तोच ठेवला. 

कंटाळूनी आम्हा जरी,
गावं आहे सोडले त्यांनी. 
नंबर आमचा पुसणार नाही,
खात्री याची ठेवतो आम्ही. 

कधी ना कधी, चुकून तरी,
आठवण त्यांना येईल आमची. 
आशा हीच धरुनी मनी,
नंबर नाही बदलला आम्ही. 
                       ----- तेजाकांत 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा